बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये डीएसपी मोनिका सिंग यांनी खाकी वर्दीचं आणि आईचं कर्तव्य अतिशय चोखपणे पार पाडलं आहे. त्यांच्या या कामगिरीचं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात पोलीस उपअधिक्षक म्हणून मोनिका काम करतात.

जोबात विधानसभा जागेसाठी आगामी पोटनिवडणुकीसाठी दोन दिवसांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मंगळवारी अलीराजपूरला आले होते. यावेळी मोनिका सिंग मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडवर तैनात होत्या. ड्यूटीवर येताना त्या आपल्या आईच्या ड्यूटीवर देखील होत्या. त्यांच्या या कामगिरीचं शिवराज सिंह चव्हाणांनी देखील ट्विट करुन कौतुक केलं आहे.

माझ्या अलीराजपूरच्या भेटीदरम्यान, मी पाहिले की डीएसपी मोनिका सिंह त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला बाळ वाहक बॅगमध्ये घेऊन कर्तव्यावर होत्या. कर्तव्याप्रती त्यांचे समर्पण कौतुकास्पद आहे. मध्य प्रदेशला तुमचा अभिमान आहे. मी त्यांच्या लहान मुलीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो, असं ट्विट शिवराज सिंह चौहानांनी केलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक काळापासून महिलेला केवळ चूल आणि मूल यासाठी पाहिलं जातं. काळ बदलला तरी अनेक ठिकाणी अजूनही ही प्रथा सुरु आहे. अशातच मोनिका सिंगची कामगिरी अनेकांना प्रेरणा देणारी असून सध्या त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

JIO ग्राहकांसाठी खुशखबर! केवळ 2 रुपये अधिक खर्चुन मिळेल 365GB डेटा, फ्री काॅलिंग अन्…

पेट्रोल-डिझेलची दरवाढ काही थांबता थांबेना, सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडलं

इम्रान खानवर स्वत:च्याच देशात चोरी करण्याची आली वेळ?

भारताने लसीकरणात महत्त्वाचा टप्पा केला पार, जगभरात भारताचाच डंका

घटस्फोटानंतर समंथाची पुन्हा एकदा न्यायालयात धाव, कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More