बेरोजगारीमुळे रागाचा उद्रेक, संतापून ‘त्या’नं मुख्यमंत्र्यांवर बाटली फेकली

अहमदनगर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेनं एका दिव्यांग तरूणानं बाटली फिरकवली. राळेगणसिद्धीमधील एका सभेत हा प्रकार घडलाय.

नगरमधील प्रशांत कानडे हा तरूण दिव्यांग असल्यानं त्याला कोणीच नोकरी देत नाहीय. त्यासाठी त्यानं मुख्यमंत्री सचिवालयाला पत्र लिहिलं होतं, परंतु कोणतचं उत्तर न आल्यानं प्रशांतच्या रागाचा उद्रेक झाला, त्यातून त्यानं हे कृत्यं केलं.

सौरकृषी वीजवाहिनी प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री राळेगणसिद्धीत आले होत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी प्रकल्पाचा नारळ फोडला.