Top News देश

‘..तर मीपण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार’; विजेंदर सिंगचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

नवी दिल्ली | कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस आंदोलन पेटतच चाललं आहे. अशातच बॉक्सर विजेंदर सिंगनेसुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मी मला देण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार असल्याचं विजेंदर सिंगनं म्हटलं आहे.

विजेंदर सिंगच्या आधी पंजाब आणि हरियाणा राज्यातील पुरस्कार विजेत्या खेळाडूंनीसुद्धा आपला पुरस्कार परत केला आहे. यामध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजन सिंग चीमा आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबीर कौर यांचा समावेश आहे.

दरम्यान, कालही शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये बैठक झाली होती. मात्र त्यामध्येही तोडगा निघाला नसून येत्या 9 डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

कोहलीने कॅच सोडूनही मॅथ्यू वेड झाला बाद, पाहा व्हिडीओ

‘केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही’; पाटलांचं पवारांना उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उर्मिला मातोंडकर यांचा प्रतिसाद; केलं सर्वात श्रेष्ठदान

रक्तदानाच्या बदल्यात चिकन आणि पनीर; शिवसैनिकाच्या ऑफरची सोशल मीडियावर चर्चा

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून मोठा बदल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या