मुंबई | जून महिना उजाडला की विद्यार्थ्यांना वेध लागतात ते शाळेचे. दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर कधी एकदा शाळेत जातोय, मित्र मैत्रिणींना भेटतोय, सुट्टीत केलेली मजा सांगतोय ,एकत्र डबा खातोय असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं.
शाळेचा (School) पहिला दिवस म्हणजे नवीन युनिफॉर्म नवे मित्र, नवे शिक्षक त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह असतो. शाळा देखील पहिल्या दिवशी मुलांच्या किलबिलाटामुळे गजबजून जाते. पण काही मुलांना शाळा अजिबात आवडत नाही. रोज ओरडून मारून शाळेत पाठवावं लागतं.
सध्या अशाच एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा चिमुकला हुंदके देऊन रडताना दिसतोय. अवो आयका माझं. माझ्या बापाला फोन करा, असं चिमुकला या व्हिडीओ बोलताना दिसतोय.
या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘शरद पवार हो म्हणाले असते तर…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी; खाद्यतेलाच्या दरात कपात
दिवाळीपर्यंत नागरिकांना ‘हे’ मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता
“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे त्यांनी सांगावं”
‘…तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये’; कृषीमंत्री दादा भुसे यांचं आवाहन
Comments are closed.