मुंबई | डोंबिवलीतील कोपर रोड परीसरात एका तरुणाने कुत्रा चावल्याच्या रागातून सोमवारी रात्री कुत्र्यालाच जीवे मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधीत आरोपीचं नाव अजय मगरे असून याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपर रोड परिसरात मिनाताई उद्यानाची देखभालीचं काम अजय नायडू गेल्या चार वर्षांपासून करत आहेत. बागेच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी शेरु नावाचा कुत्रा पाळला होता. उद्यान बंद केल्यानंतर नायडू शेरुला उद्यानात मोकळं सोडायचा. गेल्या 19 फेब्रुवारीला 2:30 च्या सुमारास अजय मगरे नावाचा तरुण दारु पिऊन बागेजवळ आला होता. नायडू यांनी त्याला उद्यान बंद झालं असल्याचं सांगितलं. मात्र अजयने त्यांचं न ऐकता भिंतीवरुन उडी मारत उद्यानाच्या आत गेला. तिथे शेरुला मोकळ सोडलेलं होतं तेवढ्यात तो अजयवर भुंकूला आणि त्याच्या हाताचा चावा घेतला.
घटनेनंतर नायडू यांनी लगेचच अजयला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात नेलं. तेथे उपचारा दरम्यान अजयने नायडू यांना कुत्र्याला मारुन टाकण्याची धमकी दिली होती. मात्र अजय दारुच्या नशेत असल्याने असं बोलत असेल, असं वाटल्याने नायडू यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.
22 फेब्रुवारीला सोमवारी रात्री नायडू उद्यान बंद करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी शेरुला आवाज दिला परंतू त्याचा प्रतिसाद आला नाही. त्याचवेळी नायडू यांच्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की अजयने शेरुला मारुन टाकलं आणि गोणीत भरुन कचराकुंडीत फेकलं आहे. नायडू यांनी कचरा कुंडीतील गोणीत पाहिलं असता त्यांना शेरु मयत अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
थोडक्यात बातम्या –
एकनाथ खडसेंना भोसरी जमिन प्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा
सुप्रसिद्ध PK सिनेमाचा सिक्वेल येणार; आमीरच्या जागी ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत!
‘सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय’; ‘या’ भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
बीडमध्ये मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम या गीतावर पार पडला विवाह, धनंजय मुंडे म्हणाले…
“स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?”
Comments are closed.