मुंबई | वडील आणि आजोबांची हत्या करून 20 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
शार्दुल मिलिंद मांगले असं तरुणाचं नाव आहे. शार्दुलनं वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. सकाळी साडे आठच्या सुमारास केअर टेकर वडिलांना चहा आणण्यासाठी किचनमध्ये गेला असताना शार्दुलनं वडिलांवर चाकूनं सपासप वार केले. जोराचा आवाज आल्यानं केअर टेकर किचनमधून बाहेर आला. तेव्हा शार्दुल त्याला वडिलांवर वार करताना दिसला.
केअर टेकरनं 84 वर्षीय आजोबांना बाथरूममध्ये लपण्याचा सल्ला दिला. मात्र ते आले नाहीत. खोलीत आलेल्या शार्दुलने त्यांचीही हत्या केली आणि त्यानंतर स्वतः इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
शार्दुलने वडील आणि आजोबांची हत्या का केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
थोडक्यात बातम्या-
चांगली खेळी करुनही पदरी निराशा, ‘सुंदर’चं शतक थोडक्यात हुकलं
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले ‘हे’ आदेश
स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
महाविकास आघाडीला दणका; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ फेरविचार याचिका फेटाळली
ओडिशातील धक्कादायक घटना; पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं
Comments are closed.