बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाने मृत्यू झालेल्या वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाने दिला नकार; मुस्लीम तरुणाने दिला अग्नी 

पाटणा | कोरोनाने मृत्यू झालेल्या वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास मुलानेच नकार दिल्याची घटना बिहारमधील दरभंगामध्ये घडली आहे. शेवटी एका मुस्लीम तरुणाने त्या पित्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत. ‘आज तक’ ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

दरभंगामध्ये असणाऱ्या DMCH रुग्णालयाने संबंधित मृत व्यक्तीच्या मुलाला त्यांच्या मृत्यूबद्दल कळवले, पण मुलाने मोबाइलच बंद केला. त्याने कोरोनाच्या भीतीपोटी वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार दिला. शेवटी कबीर संस्थानने पुढाकार घेत या व्यक्तिचा मृतदेह ताब्यात घेतला. कबीर संस्थेमध्ये असणाऱ्या एका मुस्लीम तरुणाने हिंदू पद्धतीप्रमाणे या वृद्ध व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आहेत.

मुलाने रुग्णालय प्रशासनाला एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्याने मृतदेह नेण्यासाठी त्याच्याकडे माणसं नाहीत, असं म्हटलं होतं. यानंतर मुलाने त्याचा फोन बंद ठेवला होता.

संबंधित मृत व्यक्ती कमतौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पीडारुच गावातील आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे. मात्र एक मुलगा सोडल्यास सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह होते.

थोडक्यात बातम्या- 

खळबळजनक! पत्नीने तीन कोटींच्या विम्याच्या हव्यासापोटी पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! शिवसेनेच्या रणरागिणीचं कोरोनामुळे निधन

मोदींच्या कानात बोलणाऱ्या युवकानं ओवैसींना फटकारलं, “बाहेरील व्यक्तीला देशात कसं राहू देऊ?”

तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; गुढीपाडव्याला म्हाडाची मोठी सोडत

“शपथ घेतल्यापासून महाविकासआघाडी सरकार सापाला दूध पाजतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More