सांगली | वाढदिवसाला अंगठी (Ring) गिफ्ट कर अशी मागणी केल्याने प्रियकरानेच प्रियसीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्हात घडला आहे. ताई निकम असं मृत महिलेचं नाव आहे. राहुल सर्जराव पवार या प्रियकरानेच गळा दाबून ताई निकम हिचा खून केल्याचं तपासातून समोर आलं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील येरळा नदीपात्रात एका मृत महिलेचा मृतदेह आढळून आला. अधिक तपासणीतून तो मृतदेह ताई निकमचा असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.
मृत ताई निकम यांचेे एका ज्वेलर्स मालक राहुल सर्जराव पवार यांच्याशी अनैतिक संबध होते. मिळालेल्या काॅल डिटेल्सवरून पोलिसांना खात्री पटताच राहुल पवार या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
तिने वाढदिवसानिमित्त सोन्याची अंगठी हवी असल्याचा तगादा लावला होता. अंगठी न दिल्यास प्रेमप्रकरणाबद्दल वडिलांना सांगणार अशी धमकी देत असल्याच्या कारणाने मी तिचा खून केला, असं आरोपीने पोलिसांसमोर सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अनिल परबांच्या अडचणीत वाढ!
‘…मग करायचं काय एक्सचेंज’; मुख्यमंत्र्यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना टोला
“भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने धार्मिक कार्यक्रम राजकीय करून टाकला”
‘हा महाराष्ट्राचा अपमान,अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही हा अन्याय’; सुप्रिया सुळे संतापल्या
‘मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या’; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Comments are closed.