बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी बनवले अजब नियम, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

नवी दिल्ली | आपण एखाद्यासोबत रिलेशनशीपमध्ये जातो तेव्हा आपल्याला एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. नकळत आपण एकमेकांवर आपल्या इच्छा, मर्यादा लादण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अनेकांच्या नात्यात दुरावा येतो. अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका बाॅयफ्रेंडनं आपल्या गर्लफ्रेंडसाठी चक्क एक नियमावलीच बनवली आहे.

अमेरिकेतील एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडसाठी चक्क नियमावली बनवल्यामुळे सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ही नियमांची यादी वाचून तुम्हालाही चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. कॅरोलिन नावाच्या मुलीनं टिकटॉकवर आपल्या बॉयफ्रेंडच्या स्लॅमबुकचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तिने सांगितलं, की दररोज युनिव्हर्सिटीमध्ये तिला आपल्या बॉयफ्रेंडनं घालून दिलेल्या या नियमांचं पालन करावं लागतं.

कॅरोलिनच्या बाॅयफ्रेंडनं तिच्यासाठी बनवलेल्या यादीचं पालन केलं नाही तर तिला त्यांचं नातं टिकणार नसल्याचं त्यानं सागितलं आहे. या यादीत विद्यापीठात क्रॉप टॉप आणि टाइट कपडे घालायचे नाही. तिनं कोणत्याही पार्टीमध्ये जायचं नाही, यासोबतच, त्यांच्या ‘प्रेमाचं’ प्रतीक असलेली, बॉयफ्रेंडने दिलेली अंगठीही कधी काढायची नाही.

दरम्यान, मोबाइलमध्ये स्नॅप लोकेशन आणि माय फोन हे अॅप्स डाउनलोड करायचे आहेत. तसंच, कोणतेही कपडे घालण्यापूर्वी तिनं तिच्या बॉयफ्रेंडची आणि त्याच्या आईची परवानगी घेणं आवश्यक आहे. तिनं आपल्या उंचीच्या आपल्या आसपास 25 फूट परिघामध्ये येणाऱ्या कोणत्याही मुलासोबत बोलायचं नाही, असंही यादीमध्ये म्हटलं आहे.

थोडक्य़ात बातम्या – 

कोरोना झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एवढ्या’ दिवसांची सुट्टी, सरकारनं घेतला मोठा निर्णय!

“मोदींचा चेहरा नसेल तर नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील”

“विकासाच्या नावावर उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही”

बुस्टर डोसबाबत आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

“पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी दिला तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More