मुंबई | नाशिक (Nashik) शहरातील सातपूर परिसरात असलेल्या एका विद्यालयाच्या बाहेर दहावीत शिकणाऱ्या तरुणी ह्या किरकोळ कारणाहून दहावीचा पेपर सुटल्या नंतर आपापसात भिडल्या होत्या. भर रस्त्यावर या तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं दिसून आलं आहे.
नाशिक शहर आणि ग्रामीण भागात विद्यालयात माध्यमिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी यांच्यात किरकोळ कारणाहून वाद झाला. बघता बघता या भांडणात दोन तरुणींचे गट हे आपापसात भिडलं होतं.
या तरुणींचा फ्री स्टाईल हाणामारीचा विडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वीही नाशिक शहरात तीन ते चार वेळेस प्रकार घडलेत आहेत.
दरम्यान, नाशिकमधील मुली आपापसात भिडत असल्याने सोशल मिडियावर देखील नेटकऱ्यांनी हा व्हिडीओवरुन उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-