बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रह्मनाळ दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई | ब्रह्मनाळमध्ये बोट उलटल्याची दुर्घटना घडली होती. त्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. 8 जण बेपत्ता तर 2 जण जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील पूरासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ब्रह्मनाळमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवताना ग्रामपंचायतीची बोट पूराच्या पाण्याच्या तीव्रतेमुळे उलटली होती. यामध्ये मृत पावलेल्यांपैकी एका चिमुरड्याचा त्याच्या आईच्या कुशीतच मरण पावलेला फोटो व्हायरल झाला होता.

व्हायरल झालेल्या फोटोमुळे अवघ्या महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली गेली. ब्रह्मनाळ दर्घटनेनंतरच पश्चिम महाराष्ट्रातील पूराची तीव्रता सर्वांच्या लक्षात आली.

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीतील पाण्याची पातळी 1 फूटाने कमी झाली असून अद्यापही अनेक जण पूराच्या पाण्यात अडकले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सरकारने निर्लज्जपणाचा कळस केलाय- अशोक चव्हाण

-महापुरामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरे यांची मागणी

-अखेर राज्य सरकारनं तो वादग्रस्त निर्णय बदलला; आता पूरग्रस्तांना मिळणार रोख मदत!

-#सेल्फिशसरकार | शोबाजीपायी लोकांना उपाशी माराल- धनंजय मुंडे

-धक्कादायक!!! दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर मुख्यमंत्री आणि आमदाराचं ब्रँडिंग

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More