पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी अजूनही सुरुच आहेत. ब्राह्मण महासंघांचा चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला विरोध () कायम आहे. त्यासाठी ब्राह्मण महासंघाने त्यांना 3 अटी घातल्या आहेत.
- परशुराम विकास महामंडळ तयार करावे
- पौराहित्य करणाऱ्या पुरोहितांना मानधन दिले जावे
- ब्राह्मण समाजाला अॅट्रोसिटी करण्याची परवानगी द्यावी.
या 3 अटी मान्य केल्या नाही तर चंद्रकांत पाटलांनी कोथरुडमधून उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असं आवाहन ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांनी केलं आहे.
पक्षाकडून चंद्रकांत पाटलांना आगामी काळात विधानपरिषद किंवा राज्यसभेवर देखील संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माघार घ्यावी आणि समाजाच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.
ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटलांच्या विरोधात मयुरेश अरगडे यांना आपला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. चंद्रकांत पाटलांकडून ब्राह्मण महासंघाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
रिमोट कंट्रोल बंद पडल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात; ओवैसींचा टोला https://t.co/quz6jDLRUH @ShivSena
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात; शर्मिला ठाकरे किरकोळ जखमी https://t.co/RIZ0g1LZaa @RajThackeray @mnsadhikrut #Sharmila_Thackeray
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
अजित पवारांच्या समर्थकानेच केला गोपिचंद पडळकरांचा सत्कार – https://t.co/equg13Isev @NCPspeaks @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
Comments are closed.