Top News विधानसभा निवडणूक 2019

ब्राह्मण महासंघात फूट; आनंद दवेंकडून नव्या संघटनेची स्थापना

Loading...

पुणे | कोथरुड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकात पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन ब्राह्मण महासंघात वाद निर्माण झाला होता. अखेर अखिल भारतीय ब्राह्मण महासंंघात यावरुन फूट पडली असून महासंघाचे महत्त्वाचे नेते आनंद दवे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वंतत्र संघटनेची स्थापना केली आहे.

‘ब्राह्मण महासंंघ’ असं आनंद दवे यांनी स्थापन केलेल्या संघटनेचे नाव असून ते प्रमुख पदावर असणार आहेत.  ब्राह्मण समाजाचे सध्याचे नेतृत्व विकले गेले आहे. स्थापन केलेल्या नव्या संघटनेच्या माध्यमातून सर्व जातीपातींना घेऊन हिंदूत्वाचं काम करणार आहे, असं दवे यांनी सांगितलं आहे.

Loading...

कोथरुड मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. भाजपने चंद्रकात पाटलांना उमेदवारी दिल्याने ब्राह्मण महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. बाहेरुन आलेला उमेदवार नको, घरचा हवा, अशी भूमिका महासंघाने घेतली होती.

अशातच आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटलांना परस्पर पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे रागावलेल्या ब्राह्मण महासंघाच्या वरिष्ठ नेत्यांनी दवे यांनी हकालपट्टी केली होती. त्यामुळे आनंद दवे नाराज होते. अखेर त्यांनी नवी संघटना स्थापन केली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या