ब्राह्मण आरक्षण मिळणं अशक्य- देवेंद्र फडणवीस

मुंबई |धनगर आरक्षणाची योग्य शिफारस करु. मात्र, ब्राह्मण समाजाला आर्थिक आरक्षण मिळणं शक्य नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

मी कोणत्याही प्रश्नांपासून पळणारा मुख्यमंत्री  नाही. मराठा आरक्षण असो किंवा इतर कोणतेही प्रश्न असो त्यांना सामोरं जायला मी तयार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्राह्मण समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. तशी तरतूद संविधानात नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, सध्या खुल्या प्रवर्गातील जागा खूप आहेत, तिथे त्यांनी जागा मिळवाव्या, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 84 परदेश दौऱ्यांवर 2 हजार कोटींचा खर्च!

-माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला- नितीन गडकरी

-अबब!! इशा अंबानीच्या लग्नात चक्क अमिताभ आणि आमीर वाढपी

-संभाजी भिडे VS दलित पॅंथर: भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परनावगी नाकारली

-…ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात; सामनातून RBI गव्हर्नर वादावर हल्लाबोल