बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मिर्झापूर वेब सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, बॅालिवूडमध्ये खळबळ

नवी दिल्ली | मिर्झापूर (Mirzapur) वेब सिरिजचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. मिर्झापूर या वेब सिरीझमध्ये मुन्ना त्रिपाठीच्या (Munna Tripathi) जिगरी दोस्ताच्या भूमिकेत पहायला मिळालेल्या ब्रम्हा मिश्रा (Bramha Mishra) यांच निधन (Death) झालं आहे. मिश्रा यांनी मिर्झापूर सोबतच अनेक वेबसिरीझ (Web Series) आणि चित्रपटांमध्ये (Movies) काम केलं आहे. मिश्रा यांच्या मिर्झापूरमधील अभिनयाला सर्वस्तरातून प्रोत्साहन मिळालं होतं.

ब्रम्हा मिश्रा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यपी कळालेलं नाही. पण ते बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याची महिती समोर येत आहे. 2 डिसेंबरला वर्सोवा येथील त्यांच्या राहत्या घरी ते संक्षिप्त अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी लागलीच महिती मिळताच त्यांना कूपर रूग्णालयात दाखल केलं होतं.

मिर्झापूरचे स्टार मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्येंदू शर्मा (divyendu sharma) यांनी आपल्या इंन्स्टाग्राम खात्यावरून ‘ललित इज नो मोअर’ असं म्हणत मिश्रा यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली आहे. मिश्रा यांनी आपल्या व्यावसायिक करिअरमध्ये मांझी द माऊंटन मेन, केसरी, दंगल, बद्रिनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अचानक मृत्यूनं बाॅलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, ब्रम्हा मिश्रा यांनी आपल्या अप्रतिम अभिनयानं मिर्झापूर सिरीजमध्ये अफाट चांगले काम केलं आहे. त्यांची आठवण काढताना मुन्ना त्रिपाठी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

पाहा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyenndu 💫 (@divyenndu)


थोडक्यात बातम्या 

…अन् अशोक चव्हाणांनी शेअर केला विलासरावांच्या भाषणाचा ‘तो’ जुना व्हिडीओ

“काॅंग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही”

“जागा किती तर 56 अन् बाता मात्र मोठ्या”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार?; ‘या’ तीन नावाची जोरदार चर्चा

“मंत्रीच पायघड्या घालतात, ‘ती’ भेट घेऊन शिवसेनेनं महाराष्ट्र द्रोह केला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More