बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाह छेत्री वाह! सुनिल छेत्रीने केली महान फुटबॉलपटू पेलेच्या व्रिकमाची बरोबरी

नवी दिल्ली | दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेला मालदीवमध्ये सुरूवात झाली आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने नेपाळविरूद्धच्या सामन्यात गोल झळकावल्यानंतर त्याने अजून एका विक्रमाची बरोबरी केली आहे. सुनील छत्रींच्या या गोलमुळे भारताने नेपाळविरुद्ध 1-0 असा विजय मिळवला आहे.

नेपाळविरूद्ध सामान्याच्या 82 मिनिटाला गोल केल्यामुळे ब्राझीलचा महान फुटबॉलफटू पेलेची बरोबरी केली आहे. छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पेलेच्या 77 गोलची बरोबरी केली आहे. भारतीय संघासाठी छेत्रींचा 123 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमाकांवर छेत्री पोहचला आहे.

फारूख चौधरीने दुसऱ्या सत्रात छेत्रीकडे चेंडू पास केला आणि त्या संधीचं सोनं करत नेपाळ संघाचा गोलकिपर किरण लिम्बुला चकवत धमाकेदार गोल करत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा सुनिल छेत्रींना रोवला.

दरम्यान, दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत 5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर मालदीव 6 गुणांसह पहिल्या नेपाळ 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यापुढचा भारताचा सामना मालदिवबरोबर 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर कर्णधारपदावर राहण्याचा मला काहीच हक्क नाही’; अखेर विराटने सोडलं मौन

देशातील अशिक्षित नागरिक देशावरील ओझं आहेत – अमित शहा

“लखीमपूरसारखी कोणाकडे जीप असेल तर, त्यांनी बाहेर काढून दाखवावी”

…म्हणून ‘त्या’ निर्णयाला अजित पवारांचा विरोध; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

“मला पक्षातून काढण्याची कोणाचीही हिंमत नाही, ही केवळ राजकीय लढाई”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More