बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मी रुग्णालयात दाखल झालो होतो; जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

मुंबई |आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यात सोडून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. जयंत पाटील स्वत: बैठकीतून चालत बाहेर पडले आणि रुग्णालयात जाण्यासाठी रवाना झाले होते.

जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र, आता पाटील यांनी ट्वीट करत स्वत: आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आपली प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील म्हणाले की, आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने माझी प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर आपल्या सेवेत रुजू होईल, धन्यवाद.

दरम्यान, जयंत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री आहेत. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पाटील यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत यंत्रणांना महत्वाच्या सूचना केल्या होत्या. संपूर्ण दिवस सांगली शहरातील पूरस्थितीची पाहणी करत पाटलांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.

थोडक्यात बातम्या –

पूढच्या निवडणुकीत मोदी विरूद्ध भारत असेल- ममता बॅनर्जी

राज्य सरकारचा मोठा निर्णय! खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात

‘धीर तरी कसा देऊ’; चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर असताना उर्मिला मातोंडकरांना पैसे देताना अश्रू अनावर

“शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचे लोक देखील गांभीर्योने घेत नसावेत”

बाबो! प्रशिक्षकाने मॅच अगोदर महिला खेळाडूच्या लावली कानशिलात; टोकियो ऑलिम्पिकमधील व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More