मुंबई | महाविकास आघाडी सरकार Mahavikas Aghadi Sarkar) स्थापन झाल्यापासून भाजप आणि सरकारमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे नेहमीच राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतात. अशातच आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
एकीकडे राज्यातील वातावरण गरम असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनं सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे.
शरद पवार आणि मोदींमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्याने या भेटीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय झालं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख CBI च्या ताब्यात
राजकीय भुकंप होणार?; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत
एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, न्यायालयानं दिला ‘हा’ मोठा निर्णय
कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले…
“किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मी संपवणार”
Comments are closed.