Top News देश

एकतर्फी प्रेमातून नववधूची लग्नाच्याच दिवशी हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा

नवी दिल्ली | रतलाम जिल्ह्यातील जावरा येथे रविवारी दिवसाढवळ्या नववधूचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी पसार झाला आहे.

जावरा पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. ब्यूटी पार्लर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे. एका नववधूची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्यामुळे जावरा शहरात खळबळ उडाली आहे.

नववधू मेकअप करण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये गेली होती. या दरम्यान एका माथेफिरूनं ब्यूटी पार्लरमध्ये घुसून धारदार शस्त्रानं तिचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नववधूला तातडीनं जावरा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. सोनू कमल सिंह यादव असं मृत नववधूचं नाव आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता…, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गुरूपोर्णिमेच्या शुभेच्छा

महत्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडे यांना केंद्रात ‘हे’ पद मिळण्याची शक्यता!

कोरोनाचा फास आवळला! भारत ‘या’ देशाला मागे टाकत पोहोचणार तिसऱ्या स्थानावर…

पुण्यातील भाजपच्या या माजी आमदाराला कोरोनाची लागण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या