देश

…म्हणून नवरदेवाने रागाच्या भरात केलं नवरीच्या बहिणीचं अपहरण!

नवी दिल्ली | मुरैना जिल्ह्याजवळील पोरसा ठाणे क्षेत्रात एका गावात दलित अल्पवयीन मुलीचं लग्न होणार असल्याची सूचना पोलीस प्रशासनाला मिळाली होती. यानंतर पोलीस प्रशासन बाल विवाह रोखण्यासाठी गेले असता नवरदेवाने रागाच्या भरात नवरीच्या अल्पवयीन बहिणीचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी अल्पवयीन तरुणीचं लग्न थांबवलं असून अपहरण झालेल्या नवरीच्या बहिणीलाही ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात नवरदेवाच्या नात्यातील एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र नवरदेव फरार झाला आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन अपहरण आणि बाल विवाह अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करीत फरार झालेल्या नवरदेवाचा शोध सुरू केला आहे.

लग्न थांबल्यामुळे रागाच्या भरात नवरदेवाने आपल्या नात्यातील एक महिलेला मुलीच्या घरी पाठवलं व अल्पवयीन मुलीच्या छोट्या बहिणीला लग्न करण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने घेऊन गेला. याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने तपास सुरू केला आणि अपहरण केलेल्या मुलीची सुटका केली.

थोडक्यात बातम्या-

“आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, त्यांचा कोणी हातही धरु शकत नाही”

कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका!

कोरोना लसीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहिती

“कृषी कायद्यात बदल करायला तयार, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा”

“रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या