कोलकातामध्ये माजेरहाट पूल कोसळला; 5 जणांचा मृत्यू

कोलकाता | कोलकातामधील माजेरहाट पुलाचा काही भाग कोसळला आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. 

पूल कोसळला त्यावेळी पुलाखाली अनेक गाड्या उभ्या होत्या. त्यामुळे अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत. त्या गाड्यांमध्येही अनेकजण अडकल्याची भीती आहे.

दरम्यान, पुलाखाली अडकलेल्यांचे बचाव कार्यसुरू आहे. सध्या तरी 3-4 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यांची प्रकृती मात्र गंभीर आहे. मात्र मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसमध्ये फूट नाही; राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील- अमरिंदर सिंग

-राम कदमांचा आणखी एक प्रताप; गोविंदांना दहीहंडी फोडू दिली नाही!

-जबरदस्त ट्रेलर…. राधिका आपटे आणि आयुषमानच्या ‘अंधाधूंद’चा ट्रेलर प्रदर्शित

-मुख्यमंत्री ‘ब्राह्मण’, मात्र सर्वाधिक काम मराठा समाजासाठी- विनायक मेटे

-बॉम्बे टॉकीज परिसरात लागलेली आग तब्बल दीड तासानंतर आटोक्यात

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या