बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ए..ए..आपलं आहे ते’; थोडक्यात वाचलं शिवसेनेचं पोस्टर, नाहीतर शिवसैनिकांनी… पाहा व्हिडीओ

मुंबई | मंगळवारचा दिवस गाजला तो भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी शिवसैनिकांनी राज्यभर केलेल्या आंदोलनामुळे. मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनाच्या कार्यकर्मात संबोधित करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाला हीरक महोत्सव बोलले. याचाच धागा पकडत राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त केलं होतं.

मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असं नारायण राणे म्हणाले होते. यावरूव शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी कोंबडी मोर्चा काढला, राणेंच्या पुतळ्याला चपला मारून त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यभर केलेल्या आंदोलनाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये एक व्हिडीओ असा आहे ज्यामध्ये शिवसैनिक भाजपचं पोस्टर समजून शिवसेनेचं पोस्टर फाडत होते. त्यावेळी शुटींग करणाऱ्याने त्यांना सावध केलं.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे. राणेंविरोधात पुणे, रायगड, नाशिकमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली.

 

थोडक्यात बातम्या- 

अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांसाठी पाठवलेल्या विमानाचं अपहरण

अटकेनंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ इशारा म्हणाले…

महाराष्ट्राने आज 3 पक्षांचा तीन पैशाचा तमाशा पाहिला – चंद्रकांत पाटील

नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी साजरी केली दिवाळी; पाहा व्हिडीओ

“नारायण राणेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना शॉक द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More