बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जुन्या आठवणींना उजाळा! ‘हा’ फोटो शेअर करत जयंत पाटीलांनी शिवसेनेला दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

मुंबई | गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरलं नसल्यानं गेल्यावर्षीप्रमाणं यंदाही हा वर्धापन दिन शिवसेनेच्या वतीनं साधेपणानं आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. अशातच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवसेनेची स्थापना स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली आजच्या दिवशी केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री शिवसेना स्थापनेच्याही आधीची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाकरे आणि पवार यांचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

शिवसेनेला शुभेच्छा देत जयंत पाटील यांनी म्हटलं की, भूमिपुत्रांना या राज्यात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याच्या उद्देशातून शिवसेनेचा जन्म झाला. राज्यातील सामान्य लोकांच्या हक्कांसाठी शिवसेनेनं कायमच संघर्ष केला आहे. राज्यातील सामान्य घरातील तरुणांना शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री केलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरद पवार साहेब यांची शिवसेनेच्या स्थापने पुर्वीपासून मैत्री होती.

दरम्यान, पुढे जयंत पाटील यांनी म्हटलं आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाच्या या राज्यातील सरकारनं देशाला नवी दिशा दिली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे व सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !

थोडक्यात बातम्या – 

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; वाचा आजचे दर

मोफत ‘शिवभोजन’ थाळीच्या मुदतीत केली वाढ; मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

सावधान! फिरायला जाणाऱ्यांना आता 15 दिवस होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा दणका

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More