ब्रिजभूषण सिंह यांना झटका; लैंगिक शोषणप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय

Brijbhushan Singh

Brij Bhushan Singh | उत्तर प्रदेश भाजपचे नेते आणि माजी कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप खरे ठरवले आहेत. गेल्या वर्षी काही महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर कथित लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यावेळी काही ऑलिम्पिक कुस्तीपटू तसेच काही खेळडू पीडित महिला कुस्तीपटूंचा आवाज म्हणून आंदोनल करत होत्या. मात्र आता त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आज यश मिळालं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. दिल्ली कोर्टाने ब्रिजभूषण सिंहवरील आरोप निश्चित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

ब्रिजभूषण सिंहवर कलमान्वये आरोप

ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर कलम 354, कलम 354-A, कलम 506 अंतर्गत आरोप निश्चित करण्याची परवानगी आता दिल्ली न्यायालयाने दिली आहे. कलम 354 हा महिलांचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी, बळजबरी करणे. तर 354-A कलमानुसार लैंगिक छळ, तर कलम 506 गुन्हेगारी आणि धमकी अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत.

5 जून 2023 रोजी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं होतं. कलम 354, कलम 354-A, कलम 506 अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले होते. यावर आता सहा कुस्तीपटूंकडून ब्रिजभूषण सिंह विरोधात लैंगिक आरोप करण्यात आले होते. यावर पोलिसांनी एफआय़आर नोंदवली. मात्र न्यायालायात दाद मागितली मात्र दाद फेटाळली गेली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालायाने आरोप निश्चित करण्यासाठी नकार दिला. मात्र कुस्तीपटू महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला कळवलं की तपास सुरू आहे. काही दिवसांआधी ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला.

ब्रिजभूषण यांना दोन धक्के

दरम्यान आता ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांना दुहेरी धक्का बसला आहे. सुरूवातीला त्यांना उत्तर प्रदेशमधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं नाही. त्यांच्यावर आरोप असल्याने त्यांच्या मुलाला भाजपने तिकीट दिलं. त्यांना हा पहिला वहिला धक्का बसला होता.

तसेच त्यानंतर आता दिल्ली न्यायालयाने त्यांच्यावरील झालेले आरोप हे पुरेसे आहेत. त्यांच्यावरील आरोप आता निश्चित करण्यात यावेत असं सांगितलं आहे. यामुळे त्यांना दुसरा धक्का बसला आहे.

News Title – Brij Bhushan Singh On Sexual Harrasment Case Big Decision By Delhi Court

महत्त्वाच्या बातम्या

कॅटरिना ते अनुष्का ‘या’ अभिनेत्रींचं सर्जरीमुळे झालं आश्चर्यकारक ट्रांसफॉर्मेशन; पाहा फोटो

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना मोठा दिलासा; आधी जन्मठेपेची शिक्षा आता…

…म्हणून लोक लग्नानंतरही प्रेमप्रकरणात अडकतात; ‘ही’ आहेत कारणं

रवींद्र वायकरांना अडचणीत आणण्यासाठी ठाकरेंनी आखला मोठा डाव; थेट….

सलमान लग्न कधी करणार?; मिथुन चक्रवर्तींनी केला मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .