Brijbhushan Singh | ब्रिजभूषण सिंह प्रकरणात मोठा ट्विस्ट!
नवी दिल्ली | कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांमुळे सध्या क्रिडा जगतात तणावाचं वातावरण आहे. कुस्तीपटूंंनी धरणे आंदोलन केलं होतं. त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्यामुळे नुकतंच हे आंदोलन मागं घेण्यात आलं आहे.
याचप्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट आला आहे. यासगळ्या प्रकरणाबाबतीत WFI ने क्रिडा मंत्रालयाला (Ministry of Sports) पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात WFI ने ब्रिजभूषण यांच्यावर लावण्यात आलेले लैंगिक छळाचे आरोप फेटाळून लावले आहेत. यासोबतच भारतीय कुस्ती महासंघाने (WFI ) कुस्तीपटूंबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.
WFI ने पाठवलेल्या पत्रात काही युक्तीवाद (tactic) केले आहेत. त्यात WFI ने लिहलंय की कुस्तीमहासंघात लैगिक छळ विरोधी समिती आहे. असे काही झाले असल्यास त्या समितीकडे कधीच तक्रार का झाली नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
जी निदर्शने आणि आंदोलने केली जात आहेत ती विशिष्ट राज्यातूनच (State) का करण्यात येत आहेत?. या वर्षाच्या अखेरीस WFI च्या निवडणूका (Elections) होणार असल्याने हे मुद्दाम राजकीय फायद्यासाठी केलं जात असल्याचं मत WFI ने दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
जे लैंगिक आरोप ब्रिजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला आहे त्यांचे कोणतेही पुरावे नाही आहेत. त्यामुळे करण्यात आलेलं आरोप निराधार आहेत. सध्याच्या WFI च्या अध्यक्षपदाला (Presidency) टार्गेट बनवण्यासाठी हे आरोप केले गेले असल्याचं WFI ने पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.