ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाचा ‘पद्मावती’ सिनेमाला हिरवा कंदील

लंडन | दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांचा पद्मावती सिनेमा भारतात वादात सापडलाय. मात्र तिकडे ब्रिटनमध्ये कुठलीही काट-छाट न करता ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला हिरवा कंदील दाखवलाय. 

ब्रिटनमध्ये ठरलेल्या दिवशी म्हणजेच येत्या 1 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘पद्मावती’च्या टीमला थोडा दिलासा मिळाला आहे. 

दुसरीकडे भारतीय सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा पुन्हा एकदा निर्मात्यांकडे परत पाठवलाय. या सिनेमात अनेक बदल सुचवण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे या सिनेमाच्या भारतातील प्रदर्शनाबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.