बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर ब्रिटननं भारताचं ऐकलं; दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र काही लसींमुळे बाहेर देशात जाण्यास व्यत्यय येतोय. मागील काही दिवसांपूर्वी भारतीय कोव्हिशिल्ड लसीला ब्रिटननं मान्यता देणयास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय सरकारकडून प्रचंड संताप व्यक्त केला गेला. अशातच आता कोव्हिशिल्ड लशीचा डोस घेतलेल्यांसाठी ब्रिटननं मोठी घोषणा केली आहे.

भारताकडून संताप व्यक्त झाल्यानंतर देशाच्या दबावामुळे ब्रिटननं शेवटी कोव्हिशिल्डच्या लसीला मान्यता दिली आहे. यातच आता ब्रिटननं मान्यता दिलेल्या लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना क्वारंटाईन करण्यात येणार नसल्याचीही घोषणा करण्यात आली. 11 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

कोव्हिशिल्डच्या लसीवर ब्रिटनला शंका असल्यामुळे त्यांनी या लसीला मान्यता दिली नव्हती. प्रत्येक देशानं आपल्या देशासाठी काही ठराविक लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये ब्रिटननंही आपल्या देशासाठी काही लसींची यादी केली. या यादीमध्ये कोव्हिशिल्डचं नाव वगळलं होतं. ब्रिटनमध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश जरी मिळणार असला, तरी त्यांना 10 दिवस विलगीकरणात राहावं लागणार होतं. मात्र आता 11 ऑक्टोबरपासून या नियमांमध्ये ब्रिटननं बदल केला आहे.

दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनकडे कोव्हिशिल्ड लसीला मान्यता नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परराष्ट्र मंत्री म्हणाले होते की कोविडशील्ड लसीला परवानगी न करणे हे भेदभाव करणारे धोरण आहे. यानंतर ब्रिटननं ते लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिलं होतं. शेेवटी ब्रिटनला भारताचं ऐकावच लागलं.

 

थोडक्यात बातम्या – 

“आमच्यावर गंभीर हल्ले झालेत, तरीही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणारच”

नीरज चोप्राच्या भाल्याची लागली कोट्यवधींची बोली; किंमत ऐकून व्हाल थक्क

शेतकऱ्यांवर कोसळतोय दुहेरी अडचणींचा डोंगर, एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे…

…म्हणून कोरोनाची तिसरी लाट ठरु शकते भयावह, तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

नातेवाईकांना रेल्वे फलाटावर सोडायला जाताय?, तर ही बातमी एकदा वाचा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More