बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनचा यु-टर्न; भारतीय नागरिकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली | भारतात कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना ब्रिटनकडून ‘नॉट व्हॅक्सिनेटेड’ असं सांगण्यात येत होतं. ब्रिटनच्या नवीन प्रवास नियमांवर परराष्ट्रीय मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर भारताने ब्रिटनला इशारा दिला होता. त्यानंतर ब्रिटनकडून लस धोरणामध्ये कोविशिल्डला मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शुक्ला यांनी दिलेल्या इशाऱ्यात ब्रिटनने जर लस धोरणात भारतीय लसीला मान्यता नाही दिली तर भारत सरकारकडून देखील कडक पावलं उचलली जातील, असं म्हटलं होतं. त्यानंतर एक पाऊल मागे घेत ब्रिटनकडून सीरम इन्सिट्युटच्या कोविशिल्ड लसीचं प्रमाणपत्र असणाऱ्या नागरिकांना मान्यता दिली आहे. परंतु, कोविशिल्डचं प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींना मान्यता दिली असली तरी 10 दिवस त्यांना विलगिकरणात राहावं लागणार आहे.

ब्रिटनने जरी लस प्रमाणपत्राला मान्यता दिली असली तरी युकेकडून भारतीय नागरिकांना अजून मान्यता देण्यात आली नाही. युकेने लसीचे प्रमाणपत्र मंजूर केलं नसल्यामुळं भारतीय विद्यार्थ्यांना विलगीकरणात राहावं लागत आहे. भारतातील प्रवाशांसाठी जे नियम ठरले होते त्याचा पुनश्च आढावा घेण्यासाठी भारत सरकार युके सरकारवर दबाव वाढवत असल्याचं दिसतंय.

दरम्यान, भारतीय विद्यार्थी नाराज असून त्यांना युके आणि युरोपीय संघापेक्षा वेगळी वागणूक दिली जात आहे, असं भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सनम अरोरा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

“राज्यात इतक्या घटना घडतात तरीही सरकार षंढासारखं बसलंय”

‘हे’ लक्षण आढळलं की कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते- उदयनराजे भोसले

दीपक हुड्डाला मोठा धक्का; बीसीसीआय करणार हुड्डाची चौकशी!

“ही तर राज्य सरकारची अपरिपक्वता, राज्यपालांना पत्र पाठवताना खातरजमा केली पाहिजे होती”

“Amazon ने केंद्र सरकारला 8,546 कोटींची लाच दिली”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More