बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कांस्य हुकलं पण मन जिंकलं; रोमहर्षक सामन्यात भारताच्या लेकी शेवटपर्यंत ब्रिटनला भिडल्या

टोकियो | कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीला धूळ चारत भारतीय पुरूष हाॅकी संघानं दणदणीत विजय मिळवला. भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने 5-4 असा दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं आहे. त्यानंतर आता कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात महिला हाॅकी संघाचा पराभव झाला आहे.

सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारत आणि ब्रिटन यांच्यात कांस्यपदकासाठी झालेल्या लढाईत अखेर ब्रिटनने भारताचा पराभव करत कांस्यपदक नावावर केलं आहे. सामना जरी भारतीय महिलांनी गमावला असला तरी आपल्या दमदार कामगिरीमुळे त्यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत. थरारक झालेल्या या सामन्यात ब्रिटनने भारताचा 4-3 असा पराभव केला आहे.

सामन्याच्या सुरूवातीपासून ब्रिटनने आक्रमक खेळी केली. सामन्याच्या 20 आणि 24 व्या मिनिटाला ब्रिटनने गोल करत 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी 25, 26 आणि 29 व्या मिनिटाला गोल केले. या चार मिनिटात भारताने 3 गोल दागत ब्रिटनवर दबाव निर्माण केला आणि हाफ टाईम पर्यंत 3-3 अशी बरोबरी दोन्ही संघाची होती. दुसऱ्या सत्रात भारतीय महिला खेळाडूंनी दाखवलेल्या खेळामुळे भारत सामना जिंकेल अशी आशा होती.

तिसऱ्या सत्रात दोन्ही संघाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दोन्ही संघाला पेनल्टी काॅर्नर मिळाले. परंतु दोघांनाही गोल करता आले नाही. त्यानंतर अखेरच्या 15 मिनिटाच्या सामना थरारक राहिला. 46 व्या मिनिटाला उदिताला येलो कार्ड मिळालं. त्यामुळे तिला 5 मिनिट सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर 48 व्या मिनिटाला ब्रिटनने गोल करत एका गोलची आघाडी मिळवली आणि सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

दरम्यान, अखेरच्या 10 मिनिटात भारतीय महिला खेळाडूंनी आक्रमक फटकेबाजी केली. 52 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी काॅर्नर देखील मिळाला. पंरतू याचा फायदा संघाला उचलता आला नाही. अखेरच्या काही सेकंदात चांगला बचाव करत ब्रिटेन 4-3 असा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय महिला संघाने इतिहास रचला होता. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हाॅकी संघ पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता.

थोडक्यात बातम्या-

“केंद्राचा निकाल चंद्रकांत पाटील आणि राणेंसारख्या नेत्यांना मान्य आहे का?”

‘या’ तारखेला कॉलेजेस सुरु होण्याची शक्यता; उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

“उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा”

“आमच्या लाडक्या अमृता फडणवीसांना काही काम नाही, पक्षाने त्यांची प्रवक्तेपदी नेमणूक करावी”

“अमृता वहिनींनी पुण्यावर नाही तर, गाण्यावर काम करावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More