गुजरातमध्ये झाडूमुळे काँग्रेस साफ; ‘आप’चा भाजपलाच झाला फायदा
गांधीनगर | गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) करिष्मा पाहायला मिळाला आहे. गुजरातमध्ये (Gujrat) भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षाने पूर्ण ताकद लावली होती. गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पार्टीच्या (AAP) लढतीचा भाजपला फायदा झाल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसला 32 वर्षात सर्वात कमी मते मिळाली आहेत. 1990 मध्ये भाजप राममंदिर आंदोलन करत असताना गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 31 टक्के मते मिळाली होती. यावेळी 1990 पेक्षा कमी म्हणजेच जवळपास 26 टक्के मते मिळत आहेत. 50 हून अधिक जागा गमावल्या आहेत.
गुजरातमध्ये आम आदमी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला, तेव्हा राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. 30 सप्टेंबरपासून पंतप्रधान मोदींनी 39 रॅलींद्वारे गुजरातमधील 134 विधानसभा जागा कव्हर केल्या. त्याचवेळी गृहमंत्री अमित शहा यांनी 23 रॅलींद्वारे 108 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले.
आपची ताकद भाजपला दिल्लीनंतर पंजाबमध्येही पाहायला मिळाली होती. यामुळे भाजपने गुजरात बालेकिल्ला असूनही जास्त जोर लावल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचे व्हिडीओ समोर येत राहिले यामुळेही गुजरातमध्ये आम आदमी पार्टी बॅकफूटवर दिसली.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.