बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाऊ अन् पत्नीच बनले शत्रू; दीर-भावजयीनं मिळून केलेल्या कृत्याने पुणे हादरलं

पुणे | पुण्यातील भोर येथे एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. महिलेनं आपल्या दिराच्या मदतीनं केलेल्या कृत्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेनं आपल्या दिराच्या मदतीनं पतीची दगडानं ठेचून हत्या केली आहे. संबंधित आरोपी पत्नीचं नाव देविका उर्फ भारती अमोल रंजाळे असं असून आरोपी भावाचं नाव किरण शंकर रंजाळे असं आहे.

पुण्यातील जांभूळवाडी येथील रहिवासी असणारा किरण रांजाळे हा आठ – दहा दिवसांपूर्वी आपली भावजय देविकाला घेऊन भोर तालुक्यातील धानवली याठिकाणी आपल्या बहिणेकडे आला होता. यानंतर रविवारी आरोपी पत्नी देविकाचा पती अमोलही याठिकाणी आला होता.

आपल्या घरी परतत असताना, वाटेतचं कोणत्या तरी कारणांवरून त्यांच्यात वाद झाला. यामुळे आरोपी पत्नी देविकानं आपला दीर किरण शंकर रांजाळे याच्या मदतीनं आपल्या पतीचा खून केला.

दरम्यान, पतीचा खून करुन आरोपी पत्नी आणि तिच्या दीराने मिळून मृत झालेल्या अमोल रंजाळे यांचा मृतदेह धानवली येथील सोनजाई मंदिराजवळ फेकला. गावकऱ्यांनी हा मृतदेह पाहताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करुन आरोपींना अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास भोर पोलीस करत असून या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.

थोडक्यात बातम्या-

शरीरसंबंध ठेवताना फोटो काढले अन्… पुण्यातील घटनेनं खळबळ

उत्तर प्रदेशच्या जमावाकडून पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला; गाडीची तोडफोड

पुण्यात पेट्रोलने गाठली शंभरी; इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री

रमजान ईदनिमित्त गृह विभागाकडून ‘या’ मार्गदर्शक सुचना जारी 

‘सोनिया गांधी सामनाची दखल घेतात’; संजय राऊतांचे नाना पटोलेंना चिमटे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More