बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भावा गर्लफ्रेंड iphone मागत आहे’; चाहत्याच्या प्रश्नावर सोनूचं भन्नाट उत्तर, म्हणाला….

मुंबई | लाॅकडाऊन काळात गरजूंचा मसीहा बनलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. त्यानं लाॅकडाऊन काळात अनेक गरिब लोकांची वेगवेगळ्या मार्गानं मदत केली. एवढंच नाही तर अजूनही तो मदतीचा हात पुढे सरसावताना दिसतो. कोणाला कधाही काहीही गरज लागली तर तो त्याच्या मदतीसाठी नेहमी हाजीर असलेला पहायला मिळतो. अशातच त्याच्याकडे काही मजेशीर मागण्यादेखील येत असतात. अशीच काहीशी मजेशीर मागणी सध्या त्याच्याकडे आलेली पाहायला मिळत आहे.

सोनू सूद आणि त्याचे फाउंडेशन यांना टॅग करत ‘इंजिनिअरिंग बॉय’ नावाच्या ट्विटर प्रोफाइलवरून अभिनेत्याला मेसेज करण्यात आला की, ‘भाऊ माझी मैत्रीण आयफोन मागत आहे, त्याचं काही होऊ शकते का?’ सोनूने चाहत्याला दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोनू सूदनेही या यूझरला एक मजेशीर प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झालं. सोनूने उत्तर देताना लिहिले की, ‘तिचं तर माहीत नाही, पण जर आयफोन दिलास तर तुझं काही शिल्लक राहणार नाही.’ यावर सोनूनं स्माइलीवाले इमोजीही शेअर केलं आहे.

दरम्यान, सोनूच्या या उत्तरानंतर चाहता म्हणाला, ‘भाऊ तू माझा संसार  मांडत आहे की, माझं घर तोडण्याच्या मागे लागला आहे.’ सध्या चाहत्याचं आणि सोनूचं सोशल मीडियावरील ही बातचीत तुफान व्हायरल होत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना 12वीपर्यंत माेफत शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद”

कोरोनामुक्त गावांमध्ये 10-12वीचे वर्ग पुन्हा सुरु होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकारेंनी दिले ‘हे’ निर्देश

अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणी मुंंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

“उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार”

“नरेंद्र मोदींना त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाही”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More