Top News

कागदपत्रं विचारणाऱ्यांनो आमच्या बापानं देशात 800 वर्ष राज्य केलं- ओवैसी

हैदराबाद | जी लोकं आमची कागदपत्रं पाहायला घरी येतील त्यांना सांगा आमच्या बापानं या देशावर 800 वर्ष राज्य केलं आहे. ही चारमीनार आहे ना ती आमच्या बापानं बांधली आहे, तुझ्या बापानं नाही बांधली, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना एका सभेत त्यांनी केंद्र सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे.

कुणालाही घाबरण्याची गरज नाही. ते काय बोलतात ते मान्य करण्याचीही आपल्याला गरज नाही. मुसलमानांकडे काय आहे? असं जे लोक विचारतात त्यांना मी सांगतो की हा देश माझा होता, माझा आहे आणि माझा राहील, असंही अकबरुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या देशाचा पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकावतो, तो लाल किल्ला देखील आमच्याच पूर्वजांनी दिला आहे, असा एकेरी उल्लेख करत ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवसेनेने सदैव इंदिरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मर्दानगीचा आदर केला”

‘हम ईट का जवाब पत्थर से देना जानते है’; काँग्रेसच्या राऊतांचा शिवसेनेला इशारा

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या