Santosh Deshmukh | बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील काही धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामुळे या घटनेची क्रूरता उघड झाली आहे. हे फोटो आणि व्हिडिओ संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम दर्शवतात.
हत्येचा क्रूर घटनाक्रम
समोर आलेल्या फोटोंमध्ये, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे हे आरोपी दिसत आहेत. पहिल्या छायाचित्रात, जयराम चाटे (Jayram Chate) जनावरांसारखी मारहाण केल्यानंतर संतोष देशमुख यांची पँट काढताना दिसत आहे.
दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार (Mahesh Kedar) हा या दृश्याचे सेल्फी काढताना राक्षसी हास्य करत आहे. तिसऱ्या छायाचित्रात, अमानुष मारहाणीनंतर अर्धमेले झालेल्या देशमुख यांच्या छातीवर पाय ठेवून प्रतीक घुले (Pratik Ghule) त्यांच्या चेहऱ्यावर लघवी करताना दिसत आहे. तर, सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) बाजूला उभे राहून फोटो काढत असून, त्याच्या चेहऱ्यावर क्रूर भाव दिसत आहेत.
अमानुष मारहाणीचे विदारक दृश्य
जयराम चाटे देशमुख यांच्या अंगावरील शर्ट ओढून काढतो आणि तो हातात धरून हसतो. यानंतर, मारेकरी त्यांना पाईप आणि वायरने मारहाण करतात. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यासोबतच शिवीगाळही केली जाते. वायरसारख्या हत्याराचा वापर करून देशमुख यांच्या पाठीवर वार केले जातात.
हे सर्व दृश्य पाहून कोणालाही पाझर फुटावा, मात्र महेश केदार हे सर्व हसत हसत शूट करताना दिसतो. मारहाणीनंतर, सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असे म्हणण्यासाठी देशमुख यांच्यावर जबरदस्ती केली जाते. त्यांना अंतर्वस्त्रावर बसवून पाठीवर पाईपने मारहाण केली जाते. या मारहाणीत देशमुख यांच्या शरीरातून रक्त ओघळून तळपायापर्यंत आल्याचे दिसते.
बीडचे एसपी नवनीत कॉवत (Navneet Kawat) यांनी जनतेला आवाहन केले आहे की, हे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल (Viral) झाल्यानंतर बीडमधील वातावरण तापले आहे. हे फोटो अत्यंत विचलित करणारे असल्याने ते प्रसिद्ध करणे शक्य नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.