बीएसएफच्या कार्यक्रमात अचानक सुरु झाली अश्लील चित्रफित

अमृतसर | बीएसएफच्या कार्यक्रमात अश्लील चित्रफित सुरु झाल्याने एकच खळबळ उडालीय. ७७ व्या बटालियनच्या मुख्यालयात बीएसएफच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला.

एक अधिकारी प्रेझेंटशन देण्यासाठी उठला. यावेळी लॅपटॉपमधील प्रेझेंटेशन फाईल ऐवजी त्याने चुकून अश्लील चित्रफित चालू केली. यावेळी काही महिला अधिकारीही उपस्थित होत्या. बीएसएफने हा प्रकार गांभीर्याने घेतला असून याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या