यंदा BSF पाकिस्तानी सैन्याचं तोंड गोड करणार नाही!

Army
संग्रहित फोटो

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला दरवर्षी मिठाई वाटत असतं. मात्र यंदा भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला मिठाई वाटणार नसल्याची माहिती आहे. 

पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोळीबार केला जातोय. भारतही त्याला प्रत्युत्तर देतोय. त्यामुळे यंदा सीमेवर तणावाचं वातावरण आहे. 

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानी आणि भारतीय सैन्यामध्ये 25 जानेवारीला एक बैठकही झाली आहे. या बैठकीचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.