तंत्रज्ञान

फोनवरुन बोलण्यासाठी आता पैसे लागणार नाहीत, तर पैसे मिळणार!

मुंबई | फोनवर जेवढं जास्त बोलाल तेवढे जास्त पैसे आपल्या खात्यातून वजा होतात. मात्र भारत सरकारच्या मालकीची असलेल्या BSNL कंपनीने फोनवर 5 मिनिटांपेक्षा जास्त बोलणाऱ्या ग्राहकांनाच पैसे देण्याची घोषणा केली आहे.

ग्राहकाने पाच मिनिटापेक्षा अधिक जर कॉल केला तर त्याच्या खात्यामध्ये 6 पैसे दिले जातील, अशी घोषणा BSNL तर्फे करण्यात आली आहे. ही ऑफर वायरलाईन, ब्रॉडबँड आणि FTTH ग्राहकांसाठी आहे. या योजनेमुळे जिओचे नाराज ग्राहक बीएसएनएलकडे वळतील, मात्र बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल का? हे भविष्यात कळेल, असं BSNL चे डायरेक्टर विवेक बंजल यांनी सांगितलं आहे.

रिलायन्स जिओने दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट दर लावला आहे, त्यामुळे जिओच्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. BSNL सध्या तोट्यात आहे, त्यामुळे कंपनीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवल्या जात आहेत.

दरम्यान, ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच टेलीकॉम ऑपरेटर्स वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. मात्र BSNL आता थेट कॅशबॅक ऑफर देत असल्यामुळे त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या