बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीनिमित्त BSNLची खास ऑफर! ‘या’ महिन्यात मिळेल फुकट डेटा-काॅलिंग

नवी दिल्ली |  बीएसएनएल कंपनीने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलने त्यांच्या 3 प्लॅनमध्ये बदल केले असून या प्लॅनच्या कालावधीमध्ये वाढ केली आहे. यापैकी दोन प्लॅनमध्ये 5 दिवसांची वाढ केली आहे तर एका प्लॅनमध्ये तब्बल 1 महिन्यासाठी कालावधी वाढवला आहे. या ऑफर मुळे ग्राहकांना एक महिन्यासाठी मोफत डेटा, व्हॉईसकॉलिंग यासारख्या सुविधा मिळणार आहेत.

बीएसएनएलची ही ऑफर लागू केली असून थोड्याच दिवसांसाठी ही ऑफर देण्यात येणार आहे. ही ऑफर 7 ऑक्टोबरला सुरू झाली असून 6 नोव्हेंबरपर्यंत ही ऑफर असणार आहे. बीएसएनएलची ही ऑफर 247, 398 आणि 1,999 या तीन प्लॅनवर दिली जाणार आहे. 247 रुपये आणि 398 रुपये या प्लॅनसाठी 5 दिवसाचा कालावधी मोफत दिला जाईल. तर1,999 रुपयाच्या प्लॅनवर दिवसाची म्हणजेच एक महिन्याचा कालावधी मोफत वाढवून दिला जाणार आहे.

या ऑफरमुळे 247 आणि 398 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ होउन ती 35 दिवासांची झाली आहे. तर वर्षभरासाठी सुविधा मिळणाऱ्या 1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ होउन या प्लॅनचा कालावधी 1 वर्ष 1 महिन्याचा झाला आहे. या ऑफरमध्ये मोफत डेटा तर मिळत आहेच. याशिवाय इरॉज नाऊ आणि आणि बीेएसएनए ट्यूनचं सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. ग्राहकांना सणासुदीच्या मुहूर्तावर बीएसएनएलने या ऑफरच्या माध्यमातून एक भेटचं दिली आहे.

सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने याआधीही ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. या ऑफरच्या माध्यमातून खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत आता बीएसएनएलनेही उडी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. याआधी बीएसएनएलने कोरोना काळात ग्राहकांना अनेक ऑफर्स देऊ केल्या होत्या. कोरोना संकटात पैशाच्या अडचणीमुळे कोणत्याही ग्राहकाची सेवा खंडीत होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता.

थोडक्यात बातम्या-

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

“दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही”

नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर NCB ‘या’ कारणामुळे न्यायालयात जाणार

200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी नोरा फतेहीला ईडीने बजावलं समन्स

SBI च्या ‘या’ भन्नाट योजनेत पैसे गुंतवा आणि मालामाल व्हा, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More