तंत्रज्ञान

BSNL चा नवीन प्लॅन लाँच; एका वर्षासाठी 1095GB डेटा

मुंबई  | टॅरिफ दरवाढीनंतर खासगी कंपन्यांनी आपल्या सेवा मर्यादित केल्या पण बीएसएनएलकडे अजुनही अनलिमिटेड बेनिफिट असलेले प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्सची सुरूवात 108 रुपयांपासून होते. तर बीएसएनएलच्या 1699 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3GB डेटा मिळणार आहे. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत आहे.

365 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये युजर्सना वर्षभरासाठी एकूण 1095जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट आणि होम नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल. तसंच दररोज 100 फ्री एसएमएस देखील आहेत. म्हणजेच दररोज 3GB डेटा युजर्सना मिळेल.

या प्लॅनमध्ये दररोज 2जीबी डेटा दिला जात होता पण आता नव्या ऑफरसह कंपनी यामध्ये 1जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. तर 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत याच प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3.5जीबी डेटा ऑफर मिळत होता.

दरम्यान, बीएसएनएलने चेन्नई आणि तामिळनाडू सर्कलसाठी 1,999 रुपयांचा वार्षिक प्लॅन सुरू केला असून 365 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 3जीबी डेटा मिळेल.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या