महाराष्ट्र मुंबई

“राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक, मजुरांच्या हाल अपेष्टांना काँग्रेसच जबाबदार”

नवी दिल्ली | राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक आहे, सध्या देशात मजुरांची जी काही अवस्था झाली आहे त्याला काँग्रेसच जबाबदार आहे, अशी टीका बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे.

16 मे रोजी राहुल गांधी यांनी काही मजुरांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यासंदर्भातल्या व्हिडीओवर मायावतींनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मजुरांच्या ज्या समस्या जाणून घेतल्या होत्या त्यासंदर्भातला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवरच आता मायावतींनी निशाणा साधला आहे.

सध्या देशातल्या स्थलांतरित मजुरांची जी अवस्था आहे, जी दुर्दशा झाली त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. आजच्या घडीला करोनाच्या संकटात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या काळात स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक हाल सहन करावे लागत आहेत. याला खऱ्या अर्थाने कुणी जबाबदार असेल तर काँग्रेस, असं मायावतींनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका मोठ्या कालावधीसाठी देशात काँग्रेसची सत्ता होती. एवढ्या मोठ्या शासनकाळात जर काँग्रेसने या मजुरांच्या अन्न, वस्त्र निवारा या गरजा सोडवल्या असत्या तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, असं ट्विट मायावतींनी केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

धक्कदायक! फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह

तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात; मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र

राज्यात आज 821 रूग्णांना डिस्चार्ज; पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या