हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!

हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!

भोपाळ | बहुजन समाजवादी पक्षाच्या मायावतींनी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. बसपाच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचा मध्य प्रदेशातील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र ते अवघ्या 2 जागांनी बहुमतापासून दूर राहिले. 

मायावतींच्या बसपाला मध्य प्रदेशमध्ये 2 जागांवर यश मिळाले आहे. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. 

दरम्यान, समाजवादी पक्षाला देखील मध्य प्रदेशमध्ये 1 जागा मिळाली आहे. त्यांनी देखील काँग्रेसला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेच्या भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. 

महत्वाच्या बातम्या 

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी

थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं; सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नव्हे भाजपला मिळाली आहेत सर्वात जास्त मतं…

-“पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता लोकांना भ्रष्ट वाटायला लागले आहेत”

“राज तिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”

Google+ Linkedin