नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांकडून आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
‘मिशन इंद्रधनुष’चा विस्तार करण्यात येणार असून त्यात 12 आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत 20 हजारांहून अधिक रुग्णालये आहेत. त्यात वाढ करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 6 हजार 400 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान जनआरोग्य योजनेशी 20 हजारांहून अधिक रुग्णालयं जोडण्यात आली आहेत. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. पीपीपी तत्वावर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जोडण्यात येणार आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात एकही रुग्णालय नाही त्याठिकाणी प्राधान्याने ते सुरु करण्यात येणार आहे.
जन औषधी केंद्र 2024 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात उभे करण्यात येणार असून त्यात दोन हजार औषधं आणि तीन हजार सर्जिकल्स उपलब्ध होणार आहेत. टीबी हारेगा, देश जीतेगा’ ही मोहीमही सुरू केली आहे. 2025 पर्यंत टीबी भारतातून हद्दपार करण्याचे नियोजित आहे. 2020-21 मध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी 12,300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
…म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे
कामाला जा पैसे कमवून आण…, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकललं
महत्वाच्या बातम्या-
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी नव्या योजनांची नांदी
मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमातींसाठी अर्थसंकल्पात ‘इतक्या’ कोटींची तरतूद
अर्थसंकल्प सादर करताय की कवितांचा कार्यक्रम?; काँग्रेसचा सीतारामन यांना सवाल
Comments are closed.