बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Budget 2022: ‘इतक्या’ लाख नव्या नोकऱ्या देणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली | आज 1 फेब्रुवारीला 11 वाजल्यापासून  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यामुळे आज सगळ्या देशाचं लक्ष आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे आहे.  धडाकेबाज घोषणांनी सीताराम यांनी बजेटची ओपनिंग केली.

देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी घोषणाच निर्मला सीताराम यांनी सुरुवातीला केली. त्यामुळे नागरिकांनी मोठा दिलासा मिळाला. याशिवाय त्यांनी  येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार असल्याचंही सांगितलं.

देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यामधून देशात 60 लाख नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्यामुळे युवकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा 10 वा अर्थसंकल्प आहे.  गेल्यावर्षीदेखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता. मात्र यावेळी अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडत आहेत.

थोडक्यात बातम्या  – 

Budget 2022: 1 फेब्रुवारीपासून तुमच्या खिशावर होणार परिणाम, बदलणार ‘या’ गोष्टी

‘पुष्पा असो किंवा फुसका लेकिन झुकेगा नही साला’; भाऊ कदमचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ

“तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपला संपवून टाका”

Student Protest: ऐकलं नाही तर पुन्हा ताकद दाखवू, हिंदुस्थानी भाऊचा ठाकरे सरकारला इशारा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More