Budget 2024 | देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज 23 जुलैरोजी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा तिसरा ( Budget 2024 )अर्थसंकल्प आहे. यावेळी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. अंतरिम अर्थसंकल्पात आपण तेच केले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले.
कॅन्सरवरील औषधे स्वस्त होणार
या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष ( Budget 2024 ) केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश आहे.
केंद्र सरकारने बजेटमध्ये कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. बजेटमध्ये कॅन्सरवरील औषधांना स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रुग्णांना कॅन्सरवरील उपचारात दिलासा मिळणार आहे. तसेच कॅन्सर उपचारातील उपकरणे देखील स्वस्त होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
कॅन्सर उपचारांसंदर्भातील उपकरणे स्वस्त होणार
अर्थसंकल्पात कॅन्सर औषधांना कस्टम ड्यूटीतून सुट दिली गेली आहे. कॅन्सरच्या तीन औषधांवरील सीमाशुल्क सूट आणि क्ष-किरण उपकरणांवरील BCD मध्ये बदल करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना तीन अतिरिक्त कॅन्सर वरील औषधांवरील कस्टम ड्यूटी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे रुग्णांना दिलासा भेटला आहे.
दरम्यान, मेडीकल एक्स रे मशिनमध्ये ( Budget 2024 ) बसविण्यात येणाऱ्या एक्स- रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टर फेस मॅन्युफक्टरींग प्रोग्रॅम बोलस्टर डोमेस्टीक प्रोडक्शन कॅपेसिटी अंतर्गत बेसिक कस्टम ड्यूटी ( BCD ) कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे.
News Title- Budget 2024 Cancer Drugs Will Be Cheaper
महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकारचं चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांना मोठं गिफ्ट; दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा
तरुणांसाठी खुशखबर! पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार 15000 रुपयांचा भत्ता, पैसे येणार थेट खात्यात
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा, सरकारकडून मोठ्या घोषणा!
केंद्रीय अर्थसंकल्पात कुणाला काय मिळालं?, वाचा A to Z सगळी माहिती एका क्लिकवर
आनंदवार्ता! बजेटपुर्वीच सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या आजच्या नव्या किमती