तळीरामांची चांदी! देशभरात दारू होणार स्वस्त?, अर्थसंकल्पात काय केली तरतूद?

Budget 2024 GST | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल 23 जुलैरोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला.त्यांनी आयकराच्या नवीन कर प्रणालीत काही बदलाची घोषणा केली. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, ज्यात सीमा शुल्क, जीएसटीसह इतर करांचा समावेश आहे, त्यात काही बदल केले. या नवीन तरतुदीमुळे दारु (Budget 2024 GST  ) स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारने कलम-9 मध्ये सुधारणा केली असून ईएनए हे केंद्रीय जीएसटीच्या परीघा बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. ENA म्हणजेच एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल, ज्याचा वापर अल्कोहोल बेव्हरेजेस तयार करण्यासाठी करण्यात येतो. केंद्र सरकारने सीजीएसटी (CGST) सह इंट्रिग्रेटेड जीएसटी (IGST) आणि टेरिटेरी जीएसटी (UTGST) मध्ये बदल करण्यासाठी देखील शिफारस केली आहे.

ENA बाबत महत्वाचा निर्णय

आतापर्यंत ENA वर GST लावला जात होता, पण दारूवर नाही. यामुळे मद्यनिर्मिती कंपन्यांना अडचणी येत होत्या. त्यांना कच्च्या मालावर जीएसटी भरावा लागत होता, परंतु त्यांना त्याचा (Budget 2024 GST  ) फायदा घेता येत नव्हता. आता केंद्र सरकारने ENA ला GST च्या कक्षेतून वगळले आहे. याचा अर्थ आता राज्य सरकारे त्यावर कर लावू शकतील.

दारू स्वस्त होणार की महागणार?

या निर्णयामुळे देशातंर्गत व्यापार आणि परदेशातून होणारी आयात यावरील खर्चात कपात होईल. जीएसटी परिषदेच्या बैठकीत याबाबत स्पष्टता येईल. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे (Budget 2024 GST  ) सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारने जर ईएनए संदर्भात निर्णय घेतला तर कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. मद्यविक्रीवरील कर राज्य सरकारच्या अखत्यारित्या येतो. त्यामुळे राज्य सरकारने जर या संदर्भात तयारी दाखवली तर दारूची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

News Title –  Budget 2024 GST Liquor Will Be Cheaper In The Country

महत्त्वाच्या बातम्या-

बजेटनंतर ‘या’ 9 शेअरमध्ये करा गुंतवणूक; होईल फायदाच फायदा

अर्थसंकल्पावरून टीका करणाऱ्या विरोधकांना अर्थमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या..

दिशा सालियनप्रकरणी ठाकरे पिता-पुत्राला फसवण्याचा डाव?, फडणवीसांचं नाव घेत अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

“दरेकरांनी कपाळावर कुंकू लावले तर सखू सारखे दिसतील”; जरांगे पाटील यांची टीका

“लग्न मोडलं, डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या…”, किरण गायकवाडने केला गौप्यस्फोट