बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय उभारा- इम्तियाज जलील

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने 400 कोटींची रक्कम तरतूद करण्यात आली आहे. मात्र सरकारने बाळासाहेबांच्या स्मारकाला मंजूर झालेल्या पैशावरून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंजुर झालेली 400 कोटींची रक्कम रूग्णालय उभारणीसाठी वापरावी आणि त्या रूग्णालयाला बाळासाहेबांंचं नाव देण्यात यावं, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यासोबतच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला स्मारकांची नाही तर रूग्णालयांंची गरज असल्याचं म्हटलं आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 400 कोटी रूपये आणि खर्च करण्यापेक्षा प्रत्येकी 100 कोटी खर्चून राज्यात चार मोठी रूग्णालयं त्यांच्या नावानं सुरू करता येईल, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. तर त्या चारही रूग्णालयांना बाळासाहेबांचं नाव दिली तर आमची काही हरकत नसल्याचंही जलील म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणं, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 250 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

‘ही तर लोकशाहीची चेष्टा’; सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला फटकारलं

हवेत उडणारे सोनेरी कासव पाहून लोकं झाले चकित, पाहा व्हीडिओ

अभी तो हम जवान है!; 80 वर्षाच्या दोन तरुणांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल

पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र अजित पवारांच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

नवऱ्याकडून अमानुष मारहाण; मदत मागण्यासाठी गेलेल्या गर्भवती पीडितेला पोलिसांनी हाकललं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More