महाराष्ट्र मुंबई

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई | भिवंडी शहरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 14-15 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पहाटेच्या वेळी ही सर्व दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत 25 कुटुंब वास्तव्यास होते.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या लढाईत पोलीस थकलेत, पण हिंमत हरलेले नाहीत- अनिल देशमुख

उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी; योगी आदित्यनाथ यांनी केली घोषणा

IPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, ‘या’ विक्रमात जोडलं नाव

IPL2020- सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी दिल्लीची पंजाबवर मात

“उद्धवजी…तुमची प्रतिमा कशीही असो, किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही ही काळजी घ्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या