बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष-बुलंदशहर हिंसाचाराचा मास्टरमाईंड गजाआड

लखनऊ | बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी या हिंसाचाराचा मास्टरमाईंड योगेश राजला अटक करण्यात आली आहे. तो बजंरग दलाचा जिल्हाध्यक्ष आहे. 

गोहत्येच्या संशयावरुन बुलंदशहरमध्ये सशस्त्र जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. यामध्ये पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांची गोळी मारुन हत्या करण्यात आली. 

सुबोध कुमार यांच्या हत्येनं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. योगींच्या राज्यात पोलीस अधिकारी सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त केली जातेय. 

दरम्यान, अटक केलेला योगेश राज जमावाला उसकावण्याचं काम करत होता. त्याच्यासह 3 लोकांना अटक करण्यात आली आहे तसेच 75 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-आर्चीनं कमावली झीरो फिगर; नवं रुप तुम्ही पाहिलं का???

-गोरक्षक आहेत आणि माणसं मारत आहेत; जितेंद्र आव्हाड संतापले

-तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आदिवासी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

-बुलंदशहर हिंसाचाराचं दादरी कनेक्शन; मृत पोलीस अधिकारी होते साक्षीदार

-शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारला घेरणार? मंत्र्यांना दुष्काळ दौऱ्यांचे आदेश