Top News बुलडाणा

धक्कादायक! सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभं करत दिले चटके

बुलडाणा | बुलडाण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीये. सावत्र आईने नऊ वर्षांच्या चिमुकल्याला गरम तव्यावर उभं करून पायाला चटके दिले आहे.

आर्यन सचिन शिंगोटे असं या 9 वर्षांच्या चिमुकल्याचं नाव आहे. या मुलाच्या आईने आत्महत्या केल्याने मुलांचा सांभाळ करण्यासाठी वडिलांनी दुसरं लग्न केलं. परंतु सावत्र आईकडून मात्र मुलांचा छळ सुरुये.

चार दिवसांपूर्वी आर्यनच्या सावत्र आईने आर्यनचे हातपाय पकडून त्याला गरम तव्यावर उभं करून चटके दिले. पायाला चटके लागल्यावर त्याने आरडाओरड करू नये म्हणून तिने त्यांचं तोंडही दाबून ठेवलं होतं.

आर्यन घराबाहेर येत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिल्यावर हा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. सध्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोल्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या-

ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत- सुवेंदू अधिकारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन

कसोटीतील पराभवानंतर शास्त्रींना हटवून ‘या” माजी खेळाडूची प्रशिक्षकपदी नेमण्याची मागणी

99.9 टक्के नेत्यांची काँग्रेस अध्यक्षपदासाठी ‘या’ नावाला पसंती!

…अन् टीम इंडियाने 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडीत काढला!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या