बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी… पाच वर्षांच्या ‘गुडिया’ची कोरोनावर यशस्वीपणे मात!

बुलडाणा | लहान असो वा वयस्कर सर्वांचाच कोरोनाने जेरील आणले आहे नव्हे तर पिच्छा पुरविला आहे. मोठ-मोठ्या शहरांमध्ये तर कोरोनाचे साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत मलकापूर तालुक्यातील नरवेलच्या पाच वर्षाच्या ‘गुडिया’ने कोरोनाशी चिवट झुंज देऊन कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

मुंबईतून गावाकडे आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली ही मुलगी बुलडाणा येथे कोविड केअर सेंटरला दाखल होती. या गुडियाने कोरोनावर मात करत आज सर्वांना सुखद धक्का दिला. ही गुडिया आनंदाच्या भावमुद्रेत सेंटरच्या बाहेर पडली व टाळ्या वाजवून उपस्थितांनी तिचे स्वागत केले.  गुडियाच्या सुट्टीमुळे मलकापूर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले आहे.

नरवलेच्या गुडियाला केंद्र शासनाच्या नवीन निकषांनुसार कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून न आल्यामुळे सुट्टी देण्यात आली. यानंतर तिला घरी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

नरवलेच्या या चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. त्यांनी पुष्पगुच्छ देवून चिमुकलीचे स्वागत केले.  यावेळी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी गुडीयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच गुडीयाला मोठ्या आनंदाने निरोप दिला.

ट्रेंडिंग बातम्या-

‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात आज 77 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

‘तुमच्या मुलीमुळे तुमचा आदर करत होते, पण तुम्ही…’; स्वरा ‘या’ चित्रपट निर्मात्यावर भडकली

बिपिन रावत दर महिन्याला पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला देणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More